Rajinikanth .jpg
Rajinikanth .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मोठी बातमी : सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर 

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांना यंदाचा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार, असल्याची माहीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिली.Dadasaheb Phalke Award announced for superstar Rajinikanth

सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार रजनीकांत (Rajinikanth) यांना जाहीर करण्यात आला आहे. जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.

त्याचसोबत त्यांनी ट्विट करत ही मागिती दिली. ट्वीमध्ये जावडेकर म्हणाले की ''भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेते रजनीकांतजी यांना 2019 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचे अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेले योगदान महत्वाचे आहे.'' जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले. Dadasaheb Phalke Award announced for superstar Rajinikanth

रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. रजनीकांत गेली 30 वर्ष चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात नाटकांमधून केली. कन्नड नाटकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ते तामिळ सिनेमांकडे वळाले, त्यासाठी रजनीकांत यांना तामिळ भाषेचे धडे घ्यावे लागले.

'बिल्ला' सिनेमाने दिली ओळख

रजनीकांत यांना त्यांच्या 'बिल्ला' या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. याच सिनेमवरुन नंतर बॉलिवूडमध्ये 'डॉन' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. रजनीकांत यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळते. Dadasaheb Phalke Award announced for superstar Rajinikanth

त्यांनी वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत. बिनधास्त, धडाकेबाज तसच कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी अशा सर्व प्रकारच्या अभिनयातून त्यांनी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये 'अंधा कानून' सिनेमातून त्यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत चाहत्यांची पसंती मिळवली. तर त्यानंतर हम, रा,वन, अगाज, रोबोट, शिवाजी द बिग बॉस, अशा अनेक हिंदी सिनेमातून त्यांनी काम केले आहे.     

Edited By - Amol Jaybhaye    


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT