Covid Dead
Covid Dead 
मुख्य बातम्या मोबाईल

बेड अभावी निधन झालेल्या `त्या` कोरोनाग्रस्ताला 50 लाख द्या!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कोरोनाग्रस्त बाळासाहेब कोळे यांना ज्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे जीव गमवावा लागला आहे त्यांना निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच कोळे कुटुंबीयांना महापालिकेने ५० लाखांची भरपाई म्हणून द्यावे, अशी मागणी करीत आज संविधानप्रेमी नाशिककर संस्थेतर्फे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. 

तीन दिवस बेडसाठी प्रयत्न करूनही बेड न मिळाल्याने आणि खासगी रुग्णालयात उपचाराची आर्थिक स्थिती नसल्यामुळे व्यथा नाशिक मनपा आयुक्तांकडे मांडण्यासाठी दिवंगत कोरोना रुग्ण बाळासाहेब कोळे ऑक्सिजन लावून आले असता, त्यांच्या सोबतचे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कोरोना विरोधातील लढाईत फ्रंटलाइन कोरोनायोद्धा म्हणून दीपक डोके यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आघाडीवर राहिले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेचे वाभाडे चव्हाट्यावर आणल्यामुळे मनपा प्रशासनाने स्वतःचा गलथानपणा झाकून ठेवण्यासाठीच दीपक डोके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असा आक्षेप असून मनपा प्रशासनाने अत्यंत संवेदनशील प्रकरण बेजबाबदारीने हाताळले आहे. याची पूर्ण जबाबदारी मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असून, अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन समितीचे समन्वयक किरण मोहिते, राजू देसले, संतोष जाधव, नितीन मते, ॲड. प्रभाकर वायचळे, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि खासदारांना देण्यात आले.  

यासंदर्भात प्रशासनाने मात्र थेट या रुग्णाला आंदोलन करण्यास काही राजकीय नेेत, मंडळींनी भाग पाडले होते. कोरोनाग्रस्त असतानाही त्याला घेऊन ते महापालिका मुख्यालयात आले होते. तेथे त्यांनी संबंधीत रुग्णाला बसवले. आंदोलन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे यासंदर्भात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या प्रशासन विरूद्ध आंदोलक असे चित्र आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT