Farmers Movement .jpg
Farmers Movement .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

दिल्ली हिंसाचार ; टूलकिट प्रकरणाचे बीड कनेक्शन 

सरकारनामा ब्यूरो

बीड  : नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असलेल्या 'टूलकिट' प्रकरणाचे बीड कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील संशयीत शंतनू शिवलाल मुळूक याच्या चाणक्यपुरीतील घराची नुकतीच दिल्ली पोलिसांनी झडती घेतली व त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनीही याला दुजोरा दिला आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत हिंसक प्रकार घडला. आंदोलना दरम्यान टूलकिट चे प्रकरण समोर आले असून यामध्ये बीड येथील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावरही गुन्हा नोंदवला आहे. त्याच्या चौकशी साठी दिल्ली पोलिसांचे पथक नुकतेच बीडमध्ये येऊन गेले.

पोलिस निरीक्षक सज्जनसिंग यांचे पथक पहाटेच शंतनु मुळूकच्या घरी पोचले. त्यांनी वडिल माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक व आई हेमलता मुळूक यांची चौकशी करुन त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली. तसेच अलिकडे त्याचा संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली. तसेच वडिलांना घेऊन पथक औरंगाबादलाही गेले. बँकेत जाऊन त्याच्या बँक खात्याचा तपशीलही दिल्ली पोलिसांनी घेतला. 

दरम्यान, दिल्ली पोलिस आल्याचे आणि त्यांची चौकशी करुन गेल्याचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी सांगीतले. तर, शंतनू हा पर्यावरण प्रेमी असल्याचे सांगत त्याने आंदोलनाला पाठींबा दिला. म्हणून गुन्हा नोंद करुन त्याची नाहक बदनामी केली जात, असल्याचा आरोप शिवलाल मुळूक यांनी केला. पोलिस आल्याचे सांगून त्यांना तपासात सहकार्य केल्याचे मुळूक म्हणाले. 

शंतनू हा ‘बीई’ मॅकेनिक आहे. तसेच त्याने अमेरिकेत एमएसची पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धनासंदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. शेतकऱ्यांच्या संदर्भात तळमळ असून शेतकरी आंदोलनाला शोषल मीडियाच्या माध्यमातून तो पाठींबा देत होता.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मीही शेतकऱ्याची मुलगी म्हणून पाठींबा दिल्याचे आई हेमलता मुळूक म्हणाल्या. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी कुटूंबियांत झालेल्या एका लग्न सोहळ्यासाठी शंतनु बीडला आला होता. तेव्हा त्याची आई -वडिलांशी भेट झाली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क नसल्याचे दोघांनी सांगीतले. सुरुवातीला औरंगाबाद मध्ये नोकरी करणारा शंतनू अलिकडे पुण्याला काही तरी नवीन करण्यासाठी गेलेला आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT