Subhash Desai .jpg
Subhash Desai .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ!

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेनेकडून (ShivSena) होत असते. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. त्या सत्तेमध्ये कॉंग्रेसचा महत्त्वाचा वाटा आहे. असे असतानाही शिवसेनेकडून नियमीत नामांतराची मागणी होत असते. त्यातच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा पुढे आणला आहे. (Subhash Desai said about changing the name of Aurangabad) 

देसाई औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर केले होते. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष सोबत आहेत. शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेना गंभीर असून हीच ती अनुकूल वेळ असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते याबाबत लवकरच निर्णय घेतली. काही तांत्रिक गोष्टी आहेत. त्यावरही तोडगा निघेल असे देसाई यांनी म्हटले आहे. यापुर्वीच विभागीय आयुक्तांना तसा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे हीच ती योग्य वेळ आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची, असे देसाई यांनी सांगितले. 

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर येणार असल्याचे या आधिही देसाई यांनी सांगितले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात विविध विकास कामांच्या उद्‌घाटनाचा सपाटा शिवसेनेकडून सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेनेकडून पुन्हा एकदा औरंगाबाचे नाव बदण्याचा मुद्दा पुढे केला जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.     
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT