devendra fadnavis with mohite patil and harshwardhan patil
devendra fadnavis with mohite patil and harshwardhan patil  
मुख्य बातम्या मोबाईल

इंदापूरकरांनी एवढे केले असते तर मी माजी मुख्यमंत्री झालो नसतो....

संदेश शहा

इंदापूर : इंदापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना 1500 मते जास्त दिली असती तर आपण व पाटील माजी मंत्री झालो नसतो, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पाटील यांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघात केवळ तीन हजारांच्या फरकाने पराभव झाला. त्यातील 1500 मते जरी पाटील यांना मिळाली असती तर ते आमदार असते. याची आठवण फडवणीस यांना झाली. माझ्यासोबत पाटील यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाली असती, असे त्यांनी सूतोवाच केले. मात्र पाटील यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. 

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वस्तीने इंदापूर कृषी महोत्सव 2000 अंतर्गत आयोजित पाचदिवसीय कृषी प्रदर्शनाचा समारोप फडणवीस यांच्या हस्ते झाला.  या वेळी ते बोलत होते.

आम्ही सत्तेचा घोडेबाजार केला नाही, त्यामुळे आम्ही विरोधात बसलो मात्र सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा फुगा लवकरच फुटेल असे भाकीत त्यांनी केले. सध्या राज्यात सत्तेवर असलेले सरकार शेती, सहकार व शेत- कऱ्यांकडे पहाण्यास तयार नाही. विद्यमानसरकारचे बंगले, दालने, खाती व पालक मंत्रीपदाचे वाद सहा महिन्यात मिटणार नाही तसेच त्यांचीकर्जमाफी सर्वसमावेशक नसल्याने फसवी आहे. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालेल तितके दिवस सक्षम विरोधक म्हणून काम करू तर ज्यावेळी आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी आम्ही तुम्हा शेतकऱ्यांबरोबर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री फडणवीस म्हणाले, ``राज्यात कृषी प्रदर्शन भरतात मात्र आधुनिक शेती तंत्रज्ञान, डॉग शो व घोडे बाजार याबरोबरच संपूर्ण शेतकरी कुटुंबासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्ययात्रा यामुळे हे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांना पर्वणी ठरले आहे. वातावरणातील दुष्परिणामामुळे शेतीवर अनिष्ट परिणाम होत असून अर्थकारण मजबूत होण्यासाठी शेतीत यशस्वी प्रयोग होणे गरजेचे आहे.  जलयुक्त शिवार हे अभियान लोक सहभागातून यशस्वी झाले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनासुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी 50 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले असून आम्ही 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. साखर न्यूनतम दरापेक्षा कमी दराने विकू नये असा कायदा केल्याने कारखान्यांना एफआरपी देता आली.``

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, सलग 3 वर्ष कृषी प्रदर्शन घेऊन इंदापूर बाजार समितीने आपला ब्रँड तयार केला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले असून त्यांच्या शब्दास मंत्रालयात महत्व आहे. त्यामुळे आमच्या 14 मागण्या मंजूर करण्यासाठी तसेच शेतकरी निवास बांधण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये मिळवून द्यावेत. सूत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर तर आभार प्रदर्शन सचीन भाग्यवंत यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT