बार्शी (जि. सोलापूर) : आपल्या देशामध्ये महामारी आली की, आरोग्य सुविधांची कमतरता जाणवते. पण सुविधांयुक्त देश करायचा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. प्रत्येक नागरिकाला सेवा, सुश्रूषा मिळालीच पाहिजे, असे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Devendra Fadnavis visits MLA Rajendra Raut's residence)
आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही पुत्रांच्या विवाहास उपस्थित राहू शकलो नाही. पण, दांपत्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. आमदार राजेंद राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.
या वेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयसिंह देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, आसपासच्या दोन जिल्ह्यांतील कोरोनाचे रुग्ण बार्शी शहरात उपचारासाठी दाखल होत होते. त्यानंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागला. आमदार राजेंद्र राऊत यांना माझा एक दिवसाआड फोन सुरु होता. सातत्याने समाजाचे काम धडपड करुन केले आहे, त्यामुळे यापुढे माजी कधीच व्हायचे नसून आजीच राहायचे आहे, अशा शब्दांत राऊत यांच्या कामाचे कौतुक फडणवीस यांनी केले.
निर्बंध दूर होताच भगवंत मैदान, सॉलव्हन्ट प्लॅन्ट, हॉस्पिटलच्या शुभारंभ, उदघाटनास मी येणारच असून विकासासाठी पंतप्रधान केअर फंडातून निधी देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. कोरोना अजून संपलेला नसून सर्वांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही फडणवीस यांनी या वेळी बोलताना दिला.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, सत्ता असो वा नसो आयुष्यभर तुमच्यासाठी काम करणार आहे. तुमच्यामुळेच मी माजीचा आजी झालो आहे; अन्यथा कधीच आजी झालो नसतो. तालुक्यास विकासरुपी आशीर्वाद कायम राहावा, अशी विनंती राऊत यांनी फडणवीस यांना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.