Amruta Pawar
Amruta Pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

देवगाव गटात अमृता पवार यांच्या समर्थकांचीच सरशी !

सरकारनामा ब्युरो

निफाड : जिल्ह्यात सर्वाधीक मताधिक्याने विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या आर्की अमृता वसंतराव पवार यांचे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही प्राबल्य कायम राहिले आहे. गावांच्या विकासासाठी त्यांनी विविध विचाराच्या, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले होते. त्यामुळे गटातील चारही गावांत त्यांच्या समर्थकांचीच सरशी झाली. या निकालानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. 

निफाड तालुक्यातील देवगाव गटात राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या आर्की पवार यांनी जिल्ह्यात सर्वाधीक दहा हजाराहून अधिक मताधिक्यासह निवडणूक जिंकली होती. ग्रामीण विकासासाठी राजकीय विचार, पक्ष व मतभेद बाजुला ठेऊन एकत्र काम करण्यासाठी त्यांनी सातत्यानेन ग्रामस्थ, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे गटातील चारही गावांत सर्वसमावेषक पॅनेलची निर्मीती झाली. त्यात या चारही प्रमुख गावांत आर्की पवार यांच्या समर्थकांच्या बाजुनेच मतदारांनी कौल दिला. या सर्व सदस्यांचे पवार यांनी स्वागत केले. यापुढे गावाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन उपक्रम राबविण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

रुई धानोरेला सिद्धेश्वर गौमाता पॅनेल

या जिल्हा परिषद गटातील रुई धानोरे ग्रामपंचायतीमध्ये सिद्धेश्वर गौमाता ग्रामविकास पॅनेलचे दहा पैकी नऊ जागांवर उमेदवार विजयी झाले. यामध्ये (कंसात मिळालेली मते) विनोद गोरख गायकवाड (348), नवनाथ शिवाजी तासकर (262), स्वाती अंकुश तासकर (245), लिलाबाई तुकाराम बोरगुडे (270), भागवत नंदु वाघ (517), शोभा खंडु रोटे (485), सविता केदारनाथ तासकर (585), आनंदा रामभाऊ गायकवाड (279) आणि सरला राजेंद्र पवार (255) यांचा समावेष आहे.

कोळगावला काट्या मारुती पॅनेल

कोळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ जागांपैकी सहा जागांवर काट्या मारुती ग्रामविकास पॅनेलला सहा जागा मिळाल्या आहेत. यामध्ये विजयी झालेल्या सदस्यांत प्रकाश मोतीराम कडाळे (187), नितिन अशोक कडाळे (313), रुषिकला  दत्तात्रय घोटेकर (398), संगिता साहेबराव घोटेकर (282), गोरख अशोक गवळी (251) आणि मनिषा रमेश कडाळे या बिनविरोध घोषीत झाल्या होत्या. 

देवगाव, महादेवनगरला परिवर्तन

देवगाव, महादेवनगर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनेलला तेरा पैकी नऊ जागा मिळाल्या. यामध्ये विजयी उमेदवार असे, दादासाहेब रामनाथ माळी (488), इंदुबाई सुभाष पिंपळे (542), मधुरा श्रीहरी बोचरे (561), लहानु खंडेराव मेमाने (491), कोमल भागवत गव्हाणे (481), वैशाली मच्छींद्र आडांगळे (331).

नांदुरमधमेश्वरलाही परिवर्तन पॅनेलला

नांदुरमधमेश्वर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनेलला तेरा पैकी नऊ जागा मिळाल्या. यामध्ये विजयी झालेले उमेदवार असे, उज्ज्वला राजेंद्र पगारे (215), हिराबाई दामोदर खुरासने (240), सीमा रामदास शिंदे (237),  प्रकाश  सुकदेव माळी (355), रोहिनी किरण बर्डे (381), उज्ज्वला विजय डांगळे (393), जिजाबाई लहानु कांदळकर (498), माणिक मुरलीधर शिंदे (489) आणि गायत्री राजाराम शिंदे (494).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT