Amrita Fadnavis .jpg
Amrita Fadnavis .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

तौते वादळ घोंघावत असतानाही अमृता फडणवीसांना राजकीय वादळाची प्रतीक्षा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी सकाळपासून तौते चक्रीवादळाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis)यांनी ट्वीट केले आहे. (Discussion of another tweet of Amrita Fadnavis)

या संदर्भात अमृता फडणवीस ट्वीटमध्ये म्हटल्या की ''तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है! असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तूळात चांगलीच रंगली आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांना राज्याच्या राजकारणात आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायचे आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर याचे काय परिनाम होणार का असे अनेक प्रश्न फडणवीस यांच्या या ट्वीटमुळे उपस्थित झाले आहे. 

अमृता फडणवीस या आपल्या ट्वीटमुळे आणि गाण्यांमुळे नियमीत चर्चेत असतात, अनेक वेळा त्यांना ट्रोलही केले जाते. या आधीही त्यांनी एक ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की ''पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?'' ,असे त्या म्हणाल्या होत्या, त्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT