muralidhar_rasne_ghate
muralidhar_rasne_ghate 
मुख्य बातम्या मोबाईल

महापौर मुरलीधर मोहोळांसह इतर पदाधिकारी बदलाची भाजपत चर्चा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांना सध्या पदाधिकारी बदलाचे वेध लागले आहेत. विद्यमान महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना पक्षाने ठरविल्यानुसार सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, याची आठवण हे नगरसेवक आता पक्षाच्या नेत्यांना करून देत आहेत.

याबाबत अंतिम निर्णय हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच घेतली, असे पक्षसंघटनेतील सूत्रांनी सांगितले. महापौरपदाचा कालावधी कायदेशीरदृष्ट्या अडीच वर्षांचा आहे. मात्र त्या आधीच राजीनामा घेण्यासाठी हे इच्छुक तयारीला लागले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

शेजारच्या पिंपरी -चिंचवड महापालिकेतील उपमहापौरांचा राजीनामा मुदतीआधी घेण्यात आला. आता  तेथील महापौर बदलासाठी पावले पडत आहेत. त्याचे पडसाद पुणे महापालिकेत पडत आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वीत शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना बदलून नव्यांना संधी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. महापौर निवडीच्या वेळी काय ठरले, याची आठवण नेत्यांना सूचकपणे करून देण्यात येत आहे. मोहोळ यांच्या निवडीच्या वेळीच सव्वा वर्षाचा कालावधी ठरल्याचे पक्षातील विरोधक सांगतात. तर असे काही ठरले नसल्याचे मोहोळ समर्थकांचे म्हणणे आहे. आधीच्या महापौर मुक्ता टिळक यांना पूर्ण अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. त्यामुळे मोहोळ यांनाही तशी संधी द्यावी, असा दावा त्यांच्या समर्थकांमार्फत करण्यात येत आहे. तसेच कोरोना काळात महापौरांनी चांगले काम केल्याचेही त्यांच्या समर्थकांमार्फत आवर्जून सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे या पदाला इच्छुक असलेल्यांनी आगामी महापालिका निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आता पदाधिकारी बदलले तर तोपर्यंत आणखी काही नगरसेवकांना या पदावर काम करण्याची संधी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. मोहोळ यांना नगरसेवकाच्या एकाच टर्ममध्ये स्थायी समिती अध्यक्षपदासह महापौरपदही मिळाले, याकडेही इतर इच्छुक लक्ष वेधत आहेत. इतरांना मग अशा पदांवर संधी नको का, असा प्रश्न ते विचारत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. या बदलांसाठी खासदार गट आणि इतर आमदारही आग्रही असल्याचे बोलले जाते. 

याबाबत महापौर मोहोळ यांनी `सरकारनामा`शी बोलताना पदाधिकारी बदलाच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT