Disgruntled activists of political parties will make history in elections: Nita Dhamale
Disgruntled activists of political parties will make history in elections: Nita Dhamale  
मुख्य बातम्या मोबाईल

राजकीय पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांमुळे निवडणुकीत इतिहास घडणार : नीता ढमाले 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : "महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडवून आणायचे असतील, तर प्रमुख पक्षांनी कार्यकर्त्यांना गृहीत धरणे बंद केले पाहिजे, असा संदेश या निवडणुकीतून जाणार आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याची राजकीय पद्धत मोडून काढण्यासाठीच या निवडणुकीत उभी असून मी निश्‍चितपणे निवडून येईन,' असा विश्‍वास अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांनी व्यक्त केला. 

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. 1 डिसेंबर) मतदान होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राजकीय सभांचा धुरळा उडवला गेला. पण, कार्यकर्त्यांसाठी मात्र ही निवडणूक राजकीय धडा देणारी ठरली आहे. पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी राजकीय न राहता सामाजिक प्रश्‍नांवर लढणारा असावा, असा प्रघात आहे.

पक्ष संघटन बळकट करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा नियमदेखील आतापर्यंत पक्षांनी पाळला होता. पण, या वेळी मात्र कार्यकर्त्यांना गृहित धरून राजकीय व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. याचा परिणाम म्हणजे आपल्या पक्षाच्या या निर्णयावर बहुतांश कार्यकर्ते नाराज आहेत. यामुळेच पक्ष, संघटना न बघता व्यक्ती आणि काम बघून मतदान होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

अपक्ष उमेदवार म्हणून अनेक चांगल्या व्यक्तींनी पदवीधर निवडणुकीत सहभाग घेतला आहे. नंदादीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकारण करणाऱ्या नीता ढमाले यांची या मतदारसंघावर दावेदारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर मजबूत मानली जात आहे.

विद्यार्थी, युवकांच्या प्रश्नावर सातत्याने उठवला जाणारा आवाज, गेली दोन वर्षे मतदारांशी असलेला थेट संपर्क, पुरोगामी विचारसरणीचे राजकारण करत (स्व.) यशवंतराव चव्हाण यांना आपला राजकीय आदर्श मानणाऱ्या नीता ढमाले यांना मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT