0Deepak_Maisekar_F.
0Deepak_Maisekar_F. 
मुख्य बातम्या मोबाईल

विभागीय आयुक्तांनी पुणेकरांना केले 'हे' आवाहन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरानेाच्या आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु असे लक्षात आले आहे की कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. परिणामी गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. त्यामुळेच या आजारातून मुक्त झालेल्या पुणेकरांनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढत आहे. गेल्या चोवीस तासात पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात मिळून एक हजार ६१८ रूग्ण सापडले आहेत. कोरोना तपासणीची संख्या वाढेल त्या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढत असली तरी अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त आहे. यामुळे अत्यवस्थ असलेल्या रूग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. त्यामुळे या आजारातून बरे झालेल्या रूग्णांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘प्लाइमा फेरेसिस ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. प्लाझ्मा फेरेसिससाठी वापरले जाणारे एक अत्याधुनिक मशीन आहे. या मशीनचे वैशिष्ट्य असे की यामध्ये फक्त प्लाझ्मा घेतला जातो व बाकीचे रक्त प्लाइमा दान करणाऱ्या व्यक्तीला परत दिले जाते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित असून ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केली जाते.

प्लाइमा दान करणारी व्यक्ती 18 ते 60 वयोगटातील असावी. प्लाइमा देणाऱ्या कोरोनामुक्त व्यक्तीची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी व इतर चाचण्या केल्या जातात आणि जर ती वैद्यकीयदृष्ट्या पात्र असेल तरच त्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी साधारण दीड ते दोन तास लागतात. 

प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीस अजिबात अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही. म्हणून सर्व करोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यास पात्र असल्यास प्लाझ्मा दान करुन गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे.’’ आपण रक्तदान करतो त्याप्रमाणेच ही प्रक्रिया असते. या बाबत न्यूनगंड अथवा भीती बाळगू नये. आपण दान केलेल्या प्लाझ्मामुळे अत्यवस्थ असलेल्या रूग्णाचे प्राण वाचू शकतात, हे लक्षात घेऊन कोरोनामुक्त झालेल्या जास्तीत जास्त पुणेकरांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

editing by - mangesh mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT