मुख्य बातम्या मोबाईल

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा पाडवा बारामतीत!

सरकारनामा ब्युरो

सातारा : दिवाळी पाडव्या दिवशी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार बारामतीला पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार आहेत. तेथे जाऊन सर्वजण श्री. पवार यांचा आशिर्वाद घेणार असून आगामी काळात साताऱ्यातील पक्षाच्या वाटचालीबाबतही चर्चा करणार आहेत. 

दिवाळी सणासाठी यावर्षी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे सर्व सहा आमदारांनी कुटुंबियांसोबतच दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिपावली पाडव्यादिवशी हे सर्व आमदार व खासदार बारामतीला जातात. येथे गोविंदबाग येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देतात तसेच त्यांचा आशिर्वादही घेतात. त्यानुसार येत्या गुरूवारी (ता.8) साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बारामती दौऱ्यावर आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT