corona patients
corona patients 
मुख्य बातम्या मोबाईल

काळजी करू नका; जगभरात एक लाख कोरोना रुग्ण बरे झालेत! #fightagianscorona

अतुल मेहेेरे

नागपूर ः कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. परंतु अशातही एक चांगली बातमी हाती येत आहे. ती म्हणजे जगभरात साडेतीन लाख लोक कोरोना व्हायरसने बाधित झाले होते. त्यातील एक लाख लोक बरे झाले आहेत. भारतात ४९२ बाधितांपैकी ३७ जण पूर्णतः बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली किंवा त्यांनी स्थलांतर केले आहे. 

जगाच्या पाठीवर १९२ देशांमध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. सर्वच देशांनी चीन आणि इटली या देशांपासून बोध घेत खबरदारी घेतली आहे. त्याचेच हे परीणाम असल्याचे येथे म्हणता येईल. पण काळजीची बाब म्हणजे १५ हजार लोकांचा या जीवघेण्या व्हायरसने मृत्यू झाला. त्यामुळे पुढील काही दिवस फार काळजी आणि संयमाने वागावे लागणार आहे. 

भारतातील ४९२ बाधितांपैकी ४५१ भारतीय तर ४१ नागरिक विदेशी आहेत. सर्व बाधितांपैकी ३७ जणांनी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ९ जण मृत्युमुखी पडले आहेत. आपल्या देशातील राज्यनिहाय विचार केल्यास आंध्र प्रदेशमध्ये सात बाधित आहेत. बिहारमध्ये २ बाधित असून त्यातील एकाचा मृत्यू झाला. छत्तीसगडमध्ये १, दिल्लीत ३१ बाधित असून यांपैकी सहा जणांना सुटी देण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये २९ बाधितांपैकी एकाचा मृत्यू झाला. हरीयाणात २६ बाधितांपैकी ११ जण बरे झाले आणि त्यांना सुटी देण्यात आली. हिमाचल प्रदेशात तीन बाधितांपैकी एकाचा मृत्यू झाला. कर्नाटकमध्ये ३७ बाधितांपैकी दोघांनी सुटी मिळाली तर एकाचा मृत्यू झाला. केरळात ९५ बाधितांपैकी चार जणांना सुटी मिळाली. मध्यप्रदेशात सात बाधित असून सातही जणांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात ८७ बाधिकांपैकी सर्वांवर उपचार सुरु आहेत. पैकी दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. आेडीशात दोन जण बाधित आहेत. पाॅंडेचरीमध्ये एक, पंजाबमध्ये २१ बाधितांपैकी एकाचा मृत्यू झाला. राजस्थानात ३३ बाधितांपैकी तिन जण बरे झाले असून आपल्या घरी गेले आहेत. तामिळनाडूत १२ बाधितांपैकी एक जण ठीक झाला आहे. तेलंगणात ३२ बाधितांपैकी एकाला सुटी मिळाली. चंडिगडमध्ये सहा, जम्मू काश्मीरमध्ये चार, लद्दाखमध्ये १३ जण बाधित आहेत. सर्वांवर उपचार सुरु आहेत. उत्तरप्रदेशात ३३ बाधितांपैकी ९ जण पूर्णतः बरे झाले आहेत. उत्तराखंडमध्ये तीन बाधित आहेत. पश्चिम बंगालमध्ये सात बाधितांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

संपूर्ण देशात कोरोना धुमाकूळ घालत असून संसर्ग टाळणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे येणारे काही दिवस देशावासीयांये धैर्य आणि संयमाची परीक्षा आहे. त्यामुळे देशवासीयांनी आपआपल्या घरात राहुनच या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT