Jaykumar Rawal
Jaykumar Rawal 
मुख्य बातम्या मोबाईल

ऑक्सिजनबाबत दोंडाईचा आत्मनिर्भर करू

सरकारनामा ब्युरो

दोंडाईचा : मार्च महिन्यापासुन शिंदखेडा तालुक्यात कोरानाचा मोठा प्रार्दुभाव झाला होता, पंरतू प्रशासनासह दोंडाईचा शहरातील अधिकारी आणि नगरसेवकांनी नियोजन केल्यामुळे शहरातील कोराना रोखण्यासाठी कोरोनाचा संसर्गाला अटकाव करण्यात यश येईल, असा विश्वास आमदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

दोंडाईचा नगरपालिकेच्या सभागृहात आमदार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठक झाली. यावेळी पालिकेच्या माध्यमातून शहरात रॅपीड टेस्ट केल्या जात आहेत. पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे सुध्दा तातडीने स्वॅब घेण्यात येतात, सद्यस्थितीत ४० कंटेनमेंट झोन तयार केले आहेत., याठिकाणी पालिकेकडून व्यवस्था करण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी सहा पथके केली आहेत. चाचण्यांसाठी दोन पथके आहेत. काही अडचणी निर्माण झाल्यास निवारणासाठी एक स्वतंत्र पथक व लसीकरणासाठी सात पथके आहेत. आजपर्यंत दोंडाईचा शहरात सहा हजार ६६२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

आमदार रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात एकमेव उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथे आहे. तालुक्यासह साक्री, शहादा, भागातील रूग्ण्‍ देखील येथे उपचारासाठी येतात. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी भविष्यात तिसरी लाट आली तर आपली फजिती होऊ नये म्हणून शिंदखेडा आणि दोंडाईचा या दोन्ही ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लॅंट आमदार निधीतून उभारला जाणार आहे. सध्याकोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे ज्या अडचणी आल्या तसे पुन्हा होऊ नये म्हणून शिंदखेडा तालुका ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढला आहे. ग्रामपंचायतींना देखील योग्य त्या सूचना देण्याबाबत प्रांतधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. लसीकरणाबाबत आमदार रावल यांनी नाराजी व्यक्त केली. शिंदखेडा तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी असून काही समाजसेवी संस्थांनी देखील पुढे येवून लसीकरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, अप्पर तहसिलदार सुदाम महाजन, शिंदखेडा तहसिलदार सुनिल सैंदाणे, मुख्याधिकारी प्रविण निकम, पोलिस निरीक्ष्क दुर्गेश तिवारी, देविदास पाटील, तालुका वैदयकिय अधिकारी भूषण मोरे, डॉ. हितेंद्र देशमुख, डॉ. भूषण काटे, नगरसेवक रवि उपाध्ये, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, हितेंद्र महाले, भरतरी ठाकुर, डॉ सचिन पारख, डॉ.जयेश ठाकुर, डॉ तेजस जैन, डॉ. अनिकेत पाटील उपस्थित होते.
...
हेही वाचा...

दिल्लीश्र्वरांना मराठा समाजाचा अंत पाहण्यात स्वारस्य दिसते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT