Anil Deshmukh, Parambir Singh .jpg
Anil Deshmukh, Parambir Singh .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

अनिल देशमुख प्रकरणी मुंबईतील बार मालकांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर पोलिस दलातून निलंबित केले पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात केला होता.

आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाने (ED) सुरू केला आहे. आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आले आहेत. दरम्यान, अंधेरीतील एका बार मालकांकडून सचिन वाझे यांना अडीच लाख रुपये दिले जात होते. ते परमबीरसिंगाना याची माहिती देत होते. (ED summons 5 bar owners in Mumbai)

परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीनेही तपास सुरू केला होता. काही दिवसांपूर्वीच ईडीने गुन्हा नोंदवून अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला होता.  त्यानंतर मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आले होते. या बारमालकांची चौकशी सीबीआयने देखील केली होती. 

अंधेरीतील एका बार मालकाची ई़डीने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बार मालक सचिन वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये द्यायचा. याची माहिती वाझे थेट परमबीर सिंग यांना देत होते, अशीही माहिती आहे. या प्रकरणी आता ईडीने मुंबईतील पाच बार मालकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हे बार मालक त्रास दिला जाऊन नये म्हणून वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये देत होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. 

परमबीरसिंगांनी केलेल्या आरोपानंतर ईडीने या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाची चौकशी सुरू केली. सचिन वाझे, अनिल देशमुख यांच्यासोबत गैरव्यवहारात असलेल्यांची चौकशी सध्या ईडी करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT