Covid 19
Covid 19 
मुख्य बातम्या मोबाईल

नाशिकला उपचार घेताहेत आठ हजारांवर रुग्ण

सरकारनामा ब्युरो

नाशिक : जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या खालावत एक हजारांपर्यंत आलेली असताना, गेल्‍या महिन्‍याभरापासून यात सातत्‍याने वाढ होते आहे. रविवारी (ता. १४) जिल्ह्यात एक हजार ३५६ कोरोनाबाधित आढळले आहेत.

नाशिक जिल्ह्यात बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ५२३ राहिली. दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत तब्‍बल ८३१ ने वाढ झाली असून, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आठ हजारांहून अधिक झाली आहे.

सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात आठ हजार ४८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या सहा हजार १९० असून, नाशिक ग्रामीणमध्ये एक हजार २२४ बाधितांवर, मालेगाव महापालिका हद्दीत ५७८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याबाहेरील ५६ रुग्‍णदेखील नाशिकमध्ये उपचार घेत आहेत. रविवारी नाशिक शहरातील सर्वाधिक ९४२, नाशिक ग्रामीणमधील २६९, मालेगावचे १२६, तर जिल्ह्याबाहेरील १९ बाधित आढळून आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २४२, नाशिक ग्रामीणमधील १८३, मालेगावचे ७८, तर जिल्ह्याबाहेरील वीस रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. लॅम रोड, नाशिक रोड येथील ६२ वर्षीय महिला व दिंडोरी तालुक्‍यातील खेडगाव येथील ८५ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला.

जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ६३१ संशयित दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील एक हजार ५६४ संशयित असून, जिल्‍हा रुग्‍णालयात दहा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्ण दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ४९४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ३३ हजार ५९० झाली असून, यापैकी एक लाख २३ हजार ३७३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वि‍रीत्‍या मात केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन हजार १७० बाधितांचा मृत्‍यू झाला आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT