Ekanath Khadse - MLA Chandrakant Patil
Ekanath Khadse - MLA Chandrakant Patil 
मुख्य बातम्या मोबाईल

कोथळीत खडसे परिवाराच्या पॅनलचा शिवसेनेवर विजय

सरकारनामा ब्युरो

जळगाव, : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत ‘खडसे’परिवाराच्या पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खडसे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याने ‘कोथळी’ग्रामपंचायत निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. 

खडसे व त्यांच्या कन्या ॲड.रोहिणी खडसे  यांनी  भारतीय जनता पक्षातून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’मध्ये प्रवेश केला, मात्र खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे भारतीय जनता पक्षात आहेत. यावेळी खडसे प्रणित भाजप पॅनल न करता खडसे परिवाराला मानणाऱ्या उमेदवारांचे पॅनल करण्यात आले होते. त्या विरूध्द शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे परिवर्तन पॅनल उभे होते. त्यात मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती.

कोथळी ग्रामपंचायत निवडणूकीत ११ जागा आहेत. त्या पैकी खडसे परिवाराच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत.ॲड.रोहिणी खडसे व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी सहा उमेदवार खडसे यांना माननाऱ्या गटाचे असल्याचा दावा केला आहे. गेल्या वेळी ‘कोथळी’ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा संरपंच होता, यावेळी खडसे यांच्या परिवाराच्या पॅनलचा सरपंच असेल असा दावा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे.

धुळ्यात भाजपचे वर्चस्व

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या ग्रामपंचायत मतमोजणी च्या २८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून २८ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २५ ग्रामपंचायतीवर भाजपच्या अमरीश भाई पटेल यांचं वर्चस्व कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या अमरिशभाई पटेल यांचा वर्चस्व कायम राहिल्यामुळे अमरीश पटेल यांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

नंदूरबारमध्ये चार ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना

नंदुरबार तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून ४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे. तर तीन ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे. विशेष म्हणजे कोपरली ग्रामपंचायत मध्ये ११ पैकी सर्व ११ उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष राम रघुवंशी (शिवसेना) यांना कोपर्ली गटात भाजपच्या विकास पर्व पॅनेलने जोरदार धक्का दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT