eknat khadase visit temples
eknat khadase visit temples 
मुख्य बातम्या मोबाईल

एकनाथ खडसेंचे सध्या तरी हरी हरी!

कैलास शिंदे

जळगाव : विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली मात्र तिचाही पराभव झाला.मात्र या पराभवाने खचून न जाता खडसे यांनी पुन्हा आत्मविश्‍वासाने काम सुरू केले आहे. निवडणूकीनंतर राज्यातील देवस्थानावर जावून देवदर्शन घेतले.तर त्याच ठिकाणी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चाही ते करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे मुक्ताईनगर मतदार संघातून तब्बल आठ वेळा निवडून आले.  मात्र 2019 मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली,मात्र त्यांचाही पराभव झाला. या पराभवनंतर एकनाथराव खडसे यांचे पुढचे राजकारण काय?असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता.

खडसे यांनी मात्र मुलीच्या पराभवानंतर खचून न जाता पुन्हा जोमाने कार्य सुरू केले आहे.निकालानंतर त्यांनी भगवान गडावर केलेल्या भाषणामुळे त्यांच्या पक्षांतराच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच काळात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या तर कॉंग्रेस नेत्यांच्याही ते संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अधिकच बळकटी मिळाली होती.कालातंरांने खडसे यांनीच पक्षांतराचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करीत आपण पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले.

यानंतर त्यांनी राज्यात दौरे केले यात त्यांनी राज्यातील शिर्डी,शनिशिंगणापूर, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, अक्कलकोट या देवस्थानावर जावून देवदर्शन घेतले.त्याच वेळी त्यांनी त्या-त्या ठिकाणच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्याही भेटी घेतल्या. त्या ठिकाणी आपली राजकीय मतेही ते व्यक्त करीत असल्याने राज्याच्या राजकारणात ते चर्चेतही आहेत.

भाजपतर्फे त्यांना कोणती जबाबदारी देण्यात येणार याकडेच आता लक्ष आहे. त्यांना विधानपरिषदेवर स्थान देवून विरोधी पक्षनेतेपद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT