Eknath Khadse
Eknath Khadse 
मुख्य बातम्या मोबाईल

मी पक्षाशी प्रामाणिक, दुसऱ्या यादीत नावाची शक्‍यता : एकनाथ खडसे

सरकारनामा ब्युरो

जळगाव : आज आपण मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, पहिल्या यादीत नाव आहे की नाही याची माहिती नाही. मात्र मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे दुसऱ्या यादीत नाव येण्याची शक्‍यता आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

भारतीय जनता पक्षातर्फे 125 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. त्यात खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघाचे नाव नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले, ''आपण आज मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची माहिती नाही. मात्र दुसऱ्या यादीत नाव येण्याची शक्‍यता आहे. याबाबत आपण वरीष्ठांशी बोलणार आहोत. गेली 42 वर्षे मी भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक आहे. पक्ष वाढीसाठी आणि बळकटीसाठी कार्य केले आहे. आपण प्रामणिकपणे पक्षाची सेवा केली आहे. जर प्रामाणिकपणे कार्य करणे गुन्हा असेल तर तो मी केलेला आहे.''

आजपर्यंत उमेदवारी यादी खडसे यांनीच जाहीर केल्या आहेत. त्याबाबत बोलतांना ते म्हणाले, ''गेली पंचवीस वर्षे आपण पक्षाच्या उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत होतो. पक्षाच्या सामुहिक निर्णयात आपण सहभागी होतो. पक्षाच्या आदेशानुसार युती तोडण्याची तसेच इतर निर्णय जाहीर करण्याची जबाबदारी आपल्यावर होती, आपण ती यशस्वीपणे केली. परंतु आता आपण या निर्णय प्रक्रियेत नाही. याला कालाय तस्मै नम:एवढेच म्हणावे लागेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT