eknath-khadse
eknath-khadse 
मुख्य बातम्या मोबाईल

संजय राऊतांनी अत्यंत चुकिची गोष्ट केली!

सरकारनामा ब्युरो

जळगाव : शिवसेना नेते संजय राऊत थेट राज्याचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाच पुरावे मागत आहे. ही अत्यंत चुकिची गोष्ट आहे. राऊत यांच्यां विधानावर आपली नाराजी आहे, असे मत  भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजांनी आपण त्यांचे वशंज असल्याचा पुरावा द्यावा असे विधान केले आहे. या विधानाबाबत बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे  दैवत आहेत. त्यांच्या वशंजांच्या बाबतीत असे विधान करणे अत्यंत चुकिचे आहे.आजच्या स्थितीत मुलगा हाच आपला बाप आहे, हे सिध्द करू शकत नाही. या ठिकाणी तर थेट छत्रपतींच्या वशंजाना पुरावा मागणे चुकिचे आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत चुकिचे विधान करून हा नवीन वाद उकरून काढला आहे. त्याबाबत आपली नाराजी आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT