Emotional letter from MP Srinivas Patil to little girl .jpg
Emotional letter from MP Srinivas Patil to little girl .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मिशावाल्या आजोबांचे चिमुरडीला भावनिक पत्र...  

सुनील शेडगे

कऱ्हाड : अक्कडबाज मिशांमुळे लक्षात राहणारे रूबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील. वेगवेगळ्या पातळींवर त्यांची वेगवेगळी ओळख असेलही, पण बालगोपाळांसाठी मात्र ते मिशावाले आजोबाच. याच मिशावाल्या आजोबांनी एका चिमुरडीस पत्र लिहिताना आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे.

श्रीनिवास पाटील यांच्या व्यक्तित्वाचे तसे विविधांगी पैलू. अर्थात या साऱ्यांतून त्यांचे अस्सल रांगडेपण, फर्डे वक्तृत्व अन् अक्कडबाज मिशांमुळे दिसणारे रुबाबदारपण उठून दिसते. सर्वांच्याच नजरेत भरत असते. ते जसे हजरजबाबी तसेच मिश्किलही. त्यामुळेच गमतीने ते स्वतःला मिशावाला आजोबा म्हणवून घेतात. 

अलीकडेच रमा अवधूत भट या चिमुरडीला त्यांनी स्वतः कौतुकपत्र लिहिले आहे, ही रमा जेमतेम पाच वर्षांची आहे. क-हाडलगतच्या सैदापूरची. अत्यंत तल्लख बुद्धीची, रामरक्षा, अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक म्हणण्यात ती पारंगत. चित्रकलेतही ती तितकीच निपुण आहे. जनकल्याण सरस्वती शिशुवाटिकेतील मोठ्या शिशूत ती शिकते. रमाचे आजोबा बंडा भट अन् श्रीनिवास पाटील हे वर्गमित्र. त्यामुळे परस्परांची अगदी बालपणापासूनची मैत्री आहे. खासदार पाटील अलीकडे बंडा भट यांच्या घरी गेले. तिथे रमाने त्यांना रामरक्षा, अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक म्हणून दाखविले. हे ऐकून खासदार पाटील भारावून गेले. 

त्यांनी या चिमुरडीचे कौतुक केले. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. इतकेच नव्हे तर नंतर तिला एक पत्रही पाठविले. रमाला तिच्या आजीआजोबांसह आई दीप्ती, वडील अवधूत, उज्ज्वला कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी तसेच भट कुटुंबीयांचे मार्गदर्शन लाभते आहे.

मिशावाले आजोबा पत्रात म्हणतात...

पत्रात मिशावाल्या आजोबांनी रमास अनेक कानगोष्टी सांगितल्या आहेत. पत्रात तिच्या विद्वतेचे अगदी मनापासून कौतुक केले आहे. शिशुवयात बालमुखी अशी संस्कार गाणी त्यांची सुयोग्य पेरणी करणाऱ्या शिक्षिका आणि शुभदिनी त्याची गायनी हा सुरेख त्रिवेणी संगण या प्रीतीसंगमातील यशवंतनगरीत झाल्याने मी ऐकले, मोठी हो असा आशिर्वाद देताना मातृभूमीची सेवा करण्याचा संदेशही रमाला दिला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT