Shivsena Leader Sanjay Raut Taunting BJP Everyday
Shivsena Leader Sanjay Raut Taunting BJP Everyday  
मुख्य बातम्या मोबाईल

संजय राऊतांचे ट्वीटर टोमणे सुरुच

सरकारनामा ब्युरो

मुंबई : या आधी ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांना आपण भगवान असल्याचा प्रचंड अहंपणा होता, असे सांगत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोमणे मारणे सुरुच आहे. आपल्या ट्वीटर हँडलवरुन राऊत यांनी एक शेर सादर करत भाजपला टोमणा मारला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर शरसंधान सुरु ठेवले आहे. आज त्यांनी  हबीब जालिब यांच्या शायरीचा आधार घेत भाजपवर निशाणा साधला आहे.
तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था 
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था

.......असे ट्वीट राऊत यांनी केले आहे. 

दरम्यान, नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींचे केंद्र दिल्ली असणार आहे. आज शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राऊत पवार यांची भेट घेतील असे सूत्रांनी सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT