Prabhakar More
Prabhakar More 
मुख्य बातम्या मोबाईल

माजी मंत्री शिवसेना नेते प्रभाकर मोरे यांचे  निधन

सुनील पाटकर

महाड : महाड विधानसभा मतदार संघाचे तीन वेळा प्रतिनिधीत्व करणारे  शिवसेनेचे नेते तथा माजी ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे यांचे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज  14 सप्टेंबरला  सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास  निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते

प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघाचे 1990  ते 2004 या कालावधीत सलग तीन वेळा आमदार व मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केले . त्यांच्या काळात महाडचा मोठा का यापालट झाला. ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. रस्ते , पूल, पाणी योजना , डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक अशा कामांसह महाड अतिरिक्त एमआयडीसी  निर्माण करून त्यांनी स्थानिक तरुणांना रोजगार निर्मितीसाठी भरीव कामगिरी केली. युती सरकारच्या काळात 1995 मध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री व नंतर ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिले. 

उच्च शिक्षित अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते . त्या काळात रायगड जिल्हा परिषद व महाड नगरपालिका या ठिकाणी शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे योगदान होते . पक्षघातामुळे ते वर्षभर आजारी होते .आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अमित मोरे ,पत्नी , मुलगी  नातंवडे असा मोठा परिवार आहे .त्यांच्या आकस्मित जाण्याने महाड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा मार्गदर्शक नेता हरपला, अशी प्रतिक्रिया महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत  गोगावले  यांनी दिली आहे. 

प्रभाकर मोरे यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी सायंकाळी ५ ते ७ वाजे पर्यंत त्यांच्या खारघर येथील  घरी ठेवण्यात येणार असून  अंत्यविधी कार्यक्रम महाड या ठिकाणी रविवारी सकाळी होणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT