balasaheb thorat taunts fadnavis
balasaheb thorat taunts fadnavis 
मुख्य बातम्या मोबाईल

फडणवीस यांना आणखी पूजापाठ करण्याची गरज

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ठाकरे सरकार फार काळ चालणार नाही, अशी टीका करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून देवेंद्रजी म्हणतात ते होताना दिसत नाही. त्यांना जादा पूजा करण्याची गरज आहे, असा सल्ला दिला.

फडणवीस यांनी नुकतेच आपले कुलदैवत नीरा-नरसिंहपूर येथे येऊन दर्शन घेतले होते. त्याचा आधार घेत थोरात यांनी ही टीका केली. निवडणूक प्रचारात विरोधी पक्ष नेता नसणार असे म्हणणारे विरोधी पक्षाचे नेते झाले, अशीही टीका थोरोत यांनी केली. नारायण राणे यांनीही लवकरच काहीतरी घडणार असल्याचा दावा केला होता. त्यावर विचारले असता राणे यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही, असे थोरात यांनी सांगितले.

थोरात यांनी आपल्या नवीन दालनात आपला कारभार सुरू केला. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की मंत्रीमंडळ खातेवाटपाची चर्चा आज होणे अपेक्षित आहे. पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. खातेवाटप झाल्यानंतर त्या खात्याचे काम करता येणार आहे. आढावा बैठकीत मुख्यमंत्री सगळ्यांना सोबत घेऊन जे सगळ्यांशी निगडित प्रश्न आहेत त्यावर  चर्चा करीत आहेत.

अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीने निर्णय घ्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT