मुख्य बातम्या मोबाईल

शेतकरी संकटात, शेती नष्ट झाली, फडणविसांची ठाकरे सरकारवर टीका 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य सरकारने अधिवेशन पुढे ढकललं आहे. फक्त दोन दिवस अधिवेशन आहे. शेतकरी संकटात आहे शेती नष्ट झाली आहे अशी टीका विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर केली आहे. 

-हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार आहे याकडे लक्ष वेधत फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले, की शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, अनेक समाजाच्या समस्या आहेत, मराठा समाजच्या समस्या आहेत. राज्य सरकारला न्यायालायच्या चपराक बसत आहेत सरकारच धोरण निश्‍चित झालं पाहिजे होत. किमान दोन आठवडा अधिवेशन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. 

दोन दिवसांच अधिवेशन घेणं म्हणजे चर्चे पासून पळ काढला जात आहे. आमचा विरोध दर्शविला आहे. सर्व तुम्ही उघड करत आहेत आणि अधिवेशनावर बंधन का घालतआहात.नागपूरमध्ये बजेट सेशन घेतलं पाहिजे अशी आम्ही मागणी ठेवली आहे. अनेकजण अनेक दावे करत आहेत त्यावर मला काही बोलायचं नाही असेही फडणवीस यांनी सांगितले. 

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठींबा : थोरात 

मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याची माहिती राज्याचे महसुलमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तसा ठराव करण्यात आला आहे. थोरात म्हणाले, की दिल्लीत शेतकरी एवढ्या लांबून आले आहेत मात्र, त्यांच्याशी बोलायला केंद्र सरकारला वेळ नाही तर त्यांच्यावर थंड पाण्याचा मारा करत आहे. सगळीकडे पैसे कमावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अमरीश पटेल अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये होते त्यामुळे त्यांच्या सोबत काही लोक आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT