मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेना आमदाराच्या गावातील शेतकऱ्याची आत्महत्या

सरकारनामा ब्युरो

पाटण (सातारा): शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या मरळी गावातील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आज सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अनिल रघुनाथ पाटील (वय 45) असे गळफास लावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अनिकेत उत्तम पाटील यांनी पाटण पोलिस ठाणयात दिली आहे.  

पोलिसांनी माहिती अशी : शेतकरी अनिल रघुनाथ पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी मरळी विकास सेवा सोसायटीतून कर्ज घेतले होते. त्यातच जून महिन्यापासून आजअखेर पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात शेतकरी अनिल पाटील यांचे देखील नुकसान झाले आहे. अनिल पाटील यांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने त्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास मरळी गावातील काळवट नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास हवालदार हणमंत पाटील करत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT