Copy of Sarkarnama Banner (10).jpg
Copy of Sarkarnama Banner (10).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

जळगावात उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार  

सरकारनामा ब्युरो

जळगाव :  जळगाव महापालिकेचे उपमहापौर  jalgaon deputy mayor कुलभूषण पाटील kulbhushan patil यांच्यावर चारचाकीतून पाठलाग करत सहा ते सात जणांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील मयूर कॉलनी येथे घडली. संशयित पाठलाग करत कुलभूषण पाटील यांच्या घरी आले व  त्यांनी तीनवेळा फायर केले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही. firing on jalgaon deputy mayor kulbhushan patil

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,  पिंप्राळा परिसरातील एका मैदानावर क्रिकेट खेळण्यावरून मुलांमध्ये रविवारी दुपारी २ वाजता वाद झाला. याबाबतची माहिती मिळाल्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील घटनास्थळी पोहोचले. हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रारही देण्यात आली. हा वाद मिटविण्यासाठी कुलभूषण पाटील आल्याने त्याबाबतचा राग भांडण करणाऱ्या एका गटात होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास कुलभूषण पाटील हे त्यांचे पिंप्राळा येथील सोमाणी मार्केटमधील कार्यालयात होते. यावेळी चारचाकीतून काही संशयित आले. त्यांनी कार्यालयावर गोळीबार केला. भितीने कुलभूषण पाटील दुचाकीने घराकडे निघाले. संशयितांनी कारने घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

घरासह कुलभुषण पाटील यांच्यावर गोळीबार
दुचाकीवरून उतरताच कुलभूषण पाटील यांनी घराबाहेर बसलेल्या त्यांच्या कुटूंबियांना घरात जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर स्वतः कुलभूषण पाटील हे घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेकडे पळाले. संशयितांनी कार घरासमोर उभी केली त्यातून तीन ते चार जण उतरले. पळणाऱ्या कुलभुषण पाटील यांच्या दिशेने एक वेळा तसेच त्यांचे वरच्या घरात असलेल्या चिमुकल्यांच्या दिशेने दुसरा तर हवेत तिसरा अशा पध्दतीन ३ वेळा गोळीबार केला. याठिकाणी संशयितांनी शिवीगाळही केली. पाच मिनिटे संशयित याठिकाणी थांबले. व  चारचाकीतून निघून गेले. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार झाल्यानंतर पाटील यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.  

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली. कुलभुषण पाटील यांच्या घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झाल्याची माहिती मिळाली असून  याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT