Sambhajiraje
Sambhajiraje 
मुख्य बातम्या मोबाईल

आधी माणसं जगवू, नंतर आरक्षणाचा प्रश्न हाती घेऊ !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. (Reservation is priority for maratha community) त्यामुळे हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. (we Are bonded for that) तथापि, आज आपण कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत. माणसं जगली, तरच मिळालेले आरक्षण सार्थ ठरेल. ही लढाई जिंकल्यानंतर आरक्षणासाठी मी स्वतः समाजासोबत रस्त्यावर उतरेल. अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करतानाच, सध्या रस्त्यावरचे आंदोलन सामूहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल, असा इशारा दिला.

खासदार संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षण हा समाजाच्या व युवकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व गंभीर विषय आहे. त्याबाबत काय दिशा ठरवावी यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. आऱक्षणाच्या विषयावर राज्य व केंद्र या दोन्ही शासनांकडून नेमकेपणाने निर्णय घेऊन समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याबाबत अनेक सूचना येत आहेत. काही संघटना अतिशय आक्रमक आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या विषयावर घाईगर्दीत निर्णय न घेता सर्वांच्या भावना समजून घेऊ. 

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने गायकर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ते नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते. आजचा दौरा हा राजकीय नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी गायकर कुटुंबाबरोबरच कोरोनाबळी ठरलेल्या अन्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्याही पाठीशी आपण सदैव उभे असल्याची ग्वाही दिली.

या वेळी तुषार जगताप यांच्या हस्ते शिवतिर्थ प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. विलास पांगरकर, प्रमोद जाधव, नगरसेवक योगेश शेवरे, विक्रम नागरे, बाळासाहेब लांबे, बाळा निगळ, नवनाथ शिंदे, भारत पिंगळे, प्रीतेश पाटील, गणपत जगताप, तुषार पाटील, नीलेश शेजूळ, सोनू काळे, अविनाश गोसावी आदी उपस्थित होते. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT