Sarkarnama Banner (1)
Sarkarnama Banner (1) 
मुख्य बातम्या मोबाईल

जामिनावर सुटलेल्या माजी नगराध्यक्षांसोबतचा डान्स पोलिसांना भोवला

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : अंतरिम जामिनीवर असलेले भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत डान्स करणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पाच पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने कंट्रोल विभागात बदली करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. (Five policemen were transfar after dancing with former Bhusawal mayor Anil Chaudhary)

भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार वासुदेव सोनवणे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत भुसावळ येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष व प्रहार पक्षाचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी हे शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी ‘मै हू डॉन’ आणि ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्यावर अनिल चौधरी यांच्यासमवेत ठेका धरला होता. 

या वेळी काही पोलिसांनी नोटांची ओवाळणी केल्याचे दिसत आहे. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना एका गुन्ह्यात नुकताच अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी त्यांच्यासोबत केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.

जळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी या व्हिडिओची दाखल घेतल्याचे वृत आहे. या प्रकरणी मुंडे यांनी पाच पोलिसांवर कारवाई करून त्यांची पोलिस कंट्रोल विभागात बदली करण्याचे आदेश तोंडी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT