मुख्य बातम्या मोबाईल

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेनेही कंबर कसली, शिवसाहित्य मदतीचे ट्रक रवाना 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेनेही कंबर कसली असून आज शिवसाहित्य मदतीचे ट्रक, एम्बुलेंस महापुराची झळ भसलेल्या भागाकडे रवाना होणार आहेत. 

शिवसाहित्य मदतीचे ट्रक दादर येथील शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळून रवाना होणार आहेत. या मदतीची पाहणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. शिवसाहित्य मदतीच्या ट्रकबरोबरच शिवसेनेतर्फे पुरग्रस्तभागात आरोग्य शिबीरही आयोजित करण्यात येणार असून काही डॉक्‍टर्स आणि नर्सही जाणार असल्याचे यावेळी शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT