Uma Bharti
Uma Bharti 
मुख्य बातम्या मोबाईल

शिंदे आणि साक्षी महाराज यांfच्या पाठोपाठ उमा भारतीही संघ मुख्यालयात 

राजेश चरपे

नागपूर : खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार साक्षी महाराज यांच्या पाठोपाठ भाजपच्या उपाध्यक्ष तसेच माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. सुमारे दोन तास त्यांनी येथे वेळ घालविला. मात्र माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या या भेटीमागे मध्यप्रदेशचे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे. 

उमा भारती सकाळी दहा वाजता उपराजधानीत आल्या. संघ मुख्यालयातून परतल्यानंतर त्यांनी रविभवन येथे काही वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर रेल्वेने त्या भोपाळला रवाना झाल्या. त्या नेहमीच नागपूरला येतात आणि सरसंघचाकांसोबत चर्चा करतात. असे असले तरी मध्यप्रदेशात होणाऱ्या पोट निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी त्या नागपूरला आल्या असल्याचे कळते. विशेष म्हणजे शिंदे आणि भारती दोघेही नेते मध्यप्रदेशातील राजकारणात सक्रिय आहेत. शिंदे यांचा दौरा अतिशय गोपनीय ठेवण्यात आला होता. त्यामुळे दोघांच्या भेटीचे कनेक्शन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

मध्यप्रदेशात विधानसभेच्या २४ जागांवर पोट निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले सर्वच नेते शिंदे गटाचे आहेत. यांपैकी काही मंत्रिमंडळात आहेत. उमेदवार निवडण्यासाठीच दोन्ही नेत्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. उमेदवारीवरून शिंदे समर्थक आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. त्यात समन्वय साधण्याची जबाबदारी उमा भारती यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे कळते. 

मा.गो. वैद्यंच्या मानसकन्या आहेत उमा भारती
भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती या ज्येष्ठ संघ नेते आणि संघाचे माजी प्रवक्ता मा.गो. वैद्य यांच्या मानसकन्या आहेत. मागील महिन्यात २२ तारखेला त्या नागपुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मा.गो. वैद्य यांची भेट घेतली होती. नागपुरात त्या नेहमीच येतात आणि संघ मुख्यालयाला भेटही देतात. पण यावेळी खासदार ज्योतिरादित्य शिंदे, खासदार साक्षी महाराज यांच्यानंतर उमा भारती यांनीही नागपुरात येऊन संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमागे मध्यप्रदेशच्या पोटनिवडणुकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे.         (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT