patel29.jpg
patel29.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

सरकारनामा ब्युरो

अहमदाबाद  : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (वय 92) यांचे आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसापासून अहमदाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. केशुभाई यांनी दोनवेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. गेल्या 30 सप्टेंबर रोजी सोमनाथ मंदीर ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती.  

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दोन वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले केशुभाई यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 2001 मध्ये त्यांच्याजागी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. मोदी त्यांना आपले राजकीय गुरू मानतात. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी म्हटले होते की गुजरातमधील भाजपचा रथ हाकण्याची जबाबदारी केशुभाई पटेल यांच्यावर आहे. 

केशुभाई पटेल यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात 1960 मध्ये जनसंघ कार्यकर्ता म्हणून केली होती. जनसंघाचे ते संस्थापक सदस्य होते. 1977 मध्ये  केशुभाई पटेल हे राजकोट लोकसभा मतदार संघातून निवडणूक आले होते. त्यानंतर काही दिवसात त्यांची राजीनामा दिला होता. 

बाबूभाई पटेल यांच्या जनता सरकारमध्ये त्यांनी 1978 ते 1980 दरम्यान ते कृषीमंत्री होते. ते 1978 आणि 1995 मध्ये कलावाड, गोंडल आणि विशावादार विधानसभा मतदार संघातून निवडुन आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1995 मध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, भाजपने नेत् नितीन गडकरी यांनी पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT