Former MLA Siddaram Mhetre told the mantra of overcoming Corona
Former MLA Siddaram Mhetre told the mantra of overcoming Corona  
मुख्य बातम्या मोबाईल

माजी आमदाराने सांगितला कोरोनावर मात करण्याचा यशस्वी मंत्र

सरकारनामा ब्यूरो

अक्कलकोट (जि. सोलापूर) : कोरोना या आजाराला घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. याचा अर्थ बेफिकीरसुद्धा राहून चालणार नाही. ज्याचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ चांगले आहे, तो कोरोनावर अधिक लवकर मात करू शकतो, असा स्वानुभव अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितला. 

कोरोना हा आजारच नाही, ते निव्वळ थोतांड आहे, असे प्रचार करणाऱ्या मंडळींनी ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांना किंवा त्रास भोगलेल्या कुटुंबाला विचारा म्हणजे नेमका कोरोना किती भीषण आहे, हे कळेल. मला प्राथमिक टप्यात किरकोळ ताप, खोकला वगैरे आला आणि इलाजाने कमी देखील झाला. पण पुढे आठ दिवसाने तपासणी केली आणि कोरोनाचे निदान झाले, त्यामुळे मला उपचार घेणे भाग पडले. 

कोरोना झाल्यास घाबरून न जाता मन खंबीर ठेवा. डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद द्या, शक्यतो बेडवर पालथे झोपा. जेणेकरून फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढून श्वसनक्रिया सुधारते. रुग्णांनी श्वसनाचे व्यायाम करावा. दररोज जेवढे शक्य आहे, तेवढे चालत राहावे. पौष्टिक आहार घ्यावे, जेवणात अंड्याचा भरपूर वापर करावा आणि शक्य होईल तेवढे सकाळी कोवळ्या उन्हात बसणे हिताचे ठरणार आहे.
 
हे आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी

शर्करा, रक्तदाब, हृदय आणि यकृत या संबंधी आजार पूर्वीच आहेत, त्यांनी घरीच थांबून काळजी घ्यावी. तसेच, गर्दीत अजिबात मिसळू नये. सतत मास्कचा वापर करावा. सॅनिटाइझरचा वापर करावा आणि सतत हात धुत राहावे. कारण, आपण कोरोनापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करू शकतो. आता संसर्ग वेगाने पसरतो आहे, त्यामुळे एकाला झाल्यास संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. आगामी काही दिवस प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे आपली, आपल्या कुटुंबाची व समाजाची काळजी घ्यावी. 

कोरोना झाला तरी घाबरू नका, त्यावर मात करता येते 

शरीर निरोगी राहण्यासाठी वर्षभर आपल्याला जमेल तसे नियमित व्यायाम करावा. यामध्ये चालण्याचा व्यायाम करत राहावा. पौष्टिक अन्न, सदृढ मानसिक स्थिती, कोरोनाबद्दल अधिक माहिती करून जागरूक राहणे, आपण व आपले कुटुंब व मित्र परिवार बाधित होऊ नये यासाठी सतत दक्ष राहणे आदी काळजी घेतल्यास कोरोना होणार नाही. जर यदाकदाचित झाल्यास आपण त्याच्यावर सहज मात करू शकू, असा विश्वास माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT