कोल्हापूर : भाजप राज्यात सत्तेत असताना त्रास दिला असता तर त्यांची पळता भुई थोडी झाली असती. अमल महाडिक हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते. मात्र आम्ही द्वेषाचे राजकारण केले नाही. आज ना उद्या आम्ही सत्तेत येणारच आहोत. एकदा का सत्तेत आलो की तुम्हाला ते झेपणार नाही, अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज टोला लगावला. भीमा सहकारी कारखाना बंद पडावा, यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतःच्या लेटरहेडवर पत्र दिली. त्यांच्या हस्तक खासदारांनीही असेच पत्र दिले, असेही त्यांनी सांगितले. (Former MP Dhananjay Mahadik criticizes Satej Patil)
महाडिक म्हणाले, जिल्ह्यात रत्नाप्पाअण्णा कुंभार विरुद्ध बाळासाहेब माने, सदाशिवराव मंडलिक विरूद्ध विक्रमसिंह घाटगे यांच्यात राजकीय संघर्ष झाला. पण, कोणी कोणाचा कधी राजकीय द्वेष केला नाही. अलीकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या संजय घाटगे यांच्या कारखान्याला जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सहकार्य केले. इथे मात्र उलटे आहे.
सोलापूर जिल्ह्याशी यांचा (पालकमंत्री सतेज पाटील) काही संबंध नाही. सोलापूर जिल्ह्यातील आमचा भीमा सहकारी कारखाना बंद पडावा, यासाठी लेटरहेडचा वापर करून तक्रारी केल्या. ज्यांची तिप्पट एफआरपी थकली आहे, त्यांच्याविषयी तक्रारी नाही. मात्र, त्यांना भीमा कारखानाच दिसला. आमचीही एफआरपी थकली आहे. कामागारांचे पगार द्यायचे बाकी आहेत. कारखान्यावर कारवाई झालीच, तर त्यावर २२ हजार जणांच्या चुली अवलंबून आहेत. ते लोक शाप देतील की चांगले म्हणतील. राजाराम कारखान्याच्या आठशे सभासदांचे सभासदत्व रद्द केले.
भाजप सत्तेत असताना चौकशी लावू शकलो असतो. पण आम्ही तसे केले नाही. तसे झाले असते त्यांची पळता भुई थोडी झाली असती. आम्ही सत्तेत पुन्हा येणारच आहोत, एकदा का आलो ते तुम्हाला झेपणार नाही, असा इशाराही धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिला.
भाजपने काय केले विचारता? ४७४ कोटींचा टोल आणला कोणी आणि घालवला कोणी? त्यावेळी राजीनामा द्यायला निघाले होते. टोलची पावती फाडली कोणी, असा सवाल करून महाडिक म्हणाले. सगळ्या सत्ता हव्यात कशाला? थेट पाईपलाईनच्या नावाखाली दोन निवडणुका काढल्या. येत्या निवडणुकीत लोक पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत. कोरोनाच्या काळात गोकुळची निवडणूक लावली, त्यामुळे रूग्णसंख्येत वाढ झाली. हे पाप लागणार आहे.
घरफाळा चुकविल्याप्रकरणी आयुक्तांना माहिती दिली. पण त्याही हतबल आहेत. वॉटर पार्क हस्तांतरित करावे, असे पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेत कोरोना काळात ३५ कोटींचा घोटाळा झाला, असा आरोपही महाडिक यांनी या वेळी बोलताना केला.
कमी वयात मंत्रीपद मिळाले आहे, त्याचा सकारात्मक वापर करावा. काही लागले तर आमचीही मदत घ्या; पण द्वेषाचे राजकारण थांबवा, असा सल्लाही महाडिक यांनी सतेज पाटलांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.