Praniti Shinde .jpg
Praniti Shinde .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मदतीचा एक घास...कोरोना संकटात गरजूंसाठी आमदार प्रणिती शिदेंनी स्वत: लाटल्या पोळ्या

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर शहर महिला काँग्रेस (Congress) व प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचा "मदतीचा एक घास" हा उपक्रम सुरु करणार, असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे (Congress) यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगतिले. बुधवारपासून लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध भागातील जवळपास रोज एक हजार गरजुना जेवन पुरविण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (Free food Delivery by Solapur Congress for citizens in Corona crisis)

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की ''सोलापूर शहर एक गिरणगाव म्हणून ओळखले जाते. शहरात कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बिडी कामगार, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार, रोजंदारीवर काम करत असलेले कामगार, घरेलू कामगार व इतर असंघटित कामगार शहरात आहेत. त्यांचे हातवार पोट आहे, अशा कामगारांना  कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून खूप त्रास झाला आहे. ते आर्थिक संकटात आहेत व त्यांची उपासमार होत आहे. 

त्यामुळे ते शारिरीक व मानसिक विवंचनेत आहेत. अशा व्यक्तींना आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना काहीतरी मदत करावी या प्रामाणिक इच्छेने एक खारीचा वाटा म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल पुढे सरसावले आहे. या अनुषंगाने प्रत्येक महिला कार्यकर्त्यांच्या घरातून प्रत्येकी 20 चपात्या व भाजी देण्याचा व संकलित करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला जवळपास शंभर महिला कार्यकर्ते यामध्ये सहभागी होऊन योगदान देणार आहेत.

टप्प्याटप्प्याने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह अनेक जन यात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून जमा झालेले चपाती भाजी व अन्न सोलापुरातील विविध भागातील गरजु नागरिकांना पुरविण्यात येणार असल्याचे प्राणिती शिंदे यांनी सांगितले. तसेच दानशूर व्यक्तीनी यासाठी धान्य व इतर वस्तु देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. (Free food Delivery by Solapur Congress for citizens in Corona crisis)

या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर अलकाताई राठोड, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका पनवीन इनामदार, वैष्णवी करगुळे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रियदर्शिनी सेलचे श्रद्धा हुल्लेनवरू, प्रियांका डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, कमरूनिस्सा बागवान, वीणाताई देवकते, महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT