4prakash_shendage_final.jpg
4prakash_shendage_final.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

'सारथी'ला निधी...'महाज्योती'चं काय..? मुख्यमंत्र्यांकडे आमच्यासाठी वेळ नाही...

सरकारनामा ब्युरो

पुणे : "सारथीला आजवर सरकारने 58 कोटी रुपये दिले आहेत. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. आता ओबीसीसाठी स्थापन झालेल्या महाज्योतीला 175 कोटी रुपये द्या," अशी मागणी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. "भाजप सरकारने महाज्योतीला वाऱ्यावर सोडले, आता महाविकास आघाडी सरकार न्याय देईल," असा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केला आहे. "या विषयावर आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचे आहे. आमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे का?" असेही त्यांनी म्हटले आहे.


"भाजप सरकारच्या काळात महाज्योती संस्थेची स्थापन झाली. मात्र, भाजपने त्या संस्थेला फुटकी कवडीसुद्धा दिली नाही. सारथीला निधी दिला. त्या निधीत घोटाळा झाला. त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली. हे घडत असताना ओबीसीसाठी असलेल्या महाज्योतीला मात्र, फडणवीस सरकारने काहीही मदत दिली नाही. महाज्योतीबाबत त्यांनी काहीही पावले उचलली नाहीत," असे  शेंडगे म्हणाले "सारथी मराठा समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेला आजवर 58 कोटी रुपये मिळाले आहेत. मराठा समाजाच्या तिप्पट ओबीसीची संख्या आहे. मग ओबीसीसाठी असलेल्या महाज्योतीला 175 कोटी रुपये दिले पाहिजेत. सारथीला लगेच निधी दिला जातो, मग महाज्योतीला का निधी दिला जात नाही ?" असा सवाल शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

"सारथी आणि महाज्योती भाजप सरकारच्या काळात स्थापन केलेल्या संस्था आहेत. सारथीला निधी मिळाला, त्या निधीत घोटाळा झाला.त्याची चौकशी सुरू झाली. ती संस्था सुरू झाली आणि ठप्प झाली. पण महाज्योती मात्र सुरूच झाली नाही. त्या संस्थेला एक फुटकी कवडीसुद्धा भाजपा सरकारच्या काळात मिळाली नाही. आता महाविकास आघाडीच्या काळात तरी महाज्योतीला निधी मिळेल का?" असा सवाल शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पवार यांनी काल सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली.

दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पत्र  पाठविण्यात आले आहे. त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सारथी संस्था आता नियोजन विभागाच्या अखत्यारित येणार आहे. नियोजन विभाग हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. सारथीच्या विविध प्रश्नावर काल मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.  
Edited  by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT