Jaydatta Dhas .jpg
Jaydatta Dhas .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भावी आमदार जयदत्त धस; तसे ते मागेच आमदार व्हायला हवे होते 

सरकारनामा ब्यूरो

बीड : सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने गाव दौरे आणि अंगी वडिल सुरेश धसांचे अनेक गुण असलेले जयदत्त धस २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे अंदाज फोल ठरले. परंतु, ते भावी आमदार आहेत, तसे ते यावेळीच आमदार झाले असते, असे मत महादेवानंद भारती महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. 

श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांच्या तेजस अर्बन बँकेच्या शाखेचे उद॒घाटन (डोंगरकिन्ही ता. पाटोदा) झाले. या वेळी अश्वलिंग संस्थानचे महादेवानंद भारती महाराज, शिवाजी महाराज व जयदत्त धस उपस्थित होते. महादेवानंद भारती महाराज यांनी प्रकाश कवठेकर यांच्या बँकविस्ताराला शुभेच्छा देतानाच धडाडीचे युवा नेतृत्व आणि भावी आमदार असा जयदत्त धस यांचा उल्लेख केला. तसे ते अगोदरच आमदार होतील असे वाटत होते, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी माजी सभापती महेंद्र गर्जे यांनीही विनोदाने मध्येच मध्यावधी निवडणुका लावाव्या लागतील, असे नमूद केले. 

दरम्यान, मागच्या पाच वर्षांपासून आष्टी-पाटोदा-शिरुर कासार मतदार संघातील राजकीय, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने जयदत्त धस सक्रीय आहेत. वडिल सुरेश धस यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नियोजनासह, लोकसभेच्या निवडणुकीचे मतदार संघातील नियोजनही त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. 

त्यातच  माजी आमदार साहेबराव दरेकरांचे जावई ही देखील त्यांची जमेची बाजू असल्याने ते मागची विधानसभा निवडणुक लढवितील, असे आडाखे बांधले जात होते. परंतु, कदाचित आणखी मशागत करायची ठरविल्यानेच धस थोडे थांबले असावेत. कार्यक्रमाला जिल्हा कारागृह अधीक्षक महादेव पवार, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, संतोष मानूरकर, संदीप लवांडे, जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे, शिवाजी पवार, अमरराजे निंबाळकर आदींची उपस्थिती होती. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT