Ganapatrao Deshmukh's unfulfilled dream We Will fulfill : Ramdas Athavale 
मुख्य बातम्या मोबाईल

पंढरपूर लोकसभा निवडणुकीत आबांनी सांगोल्यातून मोठे लीड मिळवून दिले होते

त्यांच्याबद्दल मला फार मोठा आदर होता.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : गणपतराव देशमुख ऊर्फ आबांचे आणि माझे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले होते. पंढरपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या वेळी 1999 व 2004 मध्ये त्यांनी मला सांगोला तालुक्यातून मोठे लीड मिळवून दिले होते. पहिल्या वेळेला जवळजवळ सव्वा लाखाचे लीड एकट्या सांगोल्यामधून मला मिळाले होते. त्यांच्याबद्दल मला फार मोठा आदर होता. शेवटपर्यंत ते जनतेच्या कामासाठी कार्यरत राहिले, अशी आठवण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितली (Ganapatrao Deshmukh's unfulfilled dream We Will fulfill : Ramdas Athavale)

शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज बुधवारी (ता. 18 ऑगस्ट) सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगोल्यात आले होते. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीवेळी आबांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, नातू बाबासाहेब देशमुख, रतनकाकी देशमुख उपस्थित होते. प्रारंभी (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 

ज्येष्ठ नेते देशमुख हे संपूर्ण महाराष्ट्रात अभ्यासू व सर्व क्षेत्रांची जाण असणारे नेते होते. त्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला फार मोठा गौरव होता. गणपतराव आबांचे अपूर्ण राहिलेले काम रिपब्लिकन पक्ष पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केले.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, गणपतराव देशमुख यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला फार मोठा गौरव होता. जवळजवळ अकरा वेळा ते विधानसभेत निवडून आले होते. त्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांचे, दलितांचे व पाण्याचा प्रश्नांसाठी मोठा लढा देऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले. शेवटपर्यंत ते जनतेच्या कामासाठी कार्यरत राहिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी रिपब्लिकन पक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंत्री या नात्याने आदरांजली वाहतो व त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन. 

या वेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे सचिव राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब बनसोडे, तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, नगरसेवक सूरज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अंबर काटे, दिगंबर गवळी, जिल्हा चिटणीस राजा मागाडे, शहराध्यक्ष सतीश काटे, धर्मा भडंगे, मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष विवेकानंद शिरसागर, सुरेंद्र ढोबळे, तेजस आढाव, सुरज होवाळ, नवा सरतापे, पिंटू सरतापे, दत्ता सावंत, गौतम चंदनशिवे, अर्जुन लांडगे, सखाराम लांडगे, गौतम जगधने, सौदागर सावंत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT