जळगाव: 'कोरोना' संसंर्गाविरोधातील लढयासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनीही कंबर कसली आहे. त्यांच्या पुढाकाराने 'ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पीटल'चा आय.सी.यु. विभाग चार दिवसांत सुरू होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना चांगली वैद्यकिय सेवा मिळावी यासाठी औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार हॉस्पीटलच्या धर्तीवर जामनेर येथे शंभर बेडचे हॉस्पीटल उभारण्याचे काम गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. हॉस्पीटल आणि नर्सिंग महाविद्यालय या ठिकाणी असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर या हॉस्पिटलची सुविधा तातडीने देण्याची भुमिका गिरीश महाजन यांनी घेतली आहे.
यासंदर्भात गिरीश महाजन म्हणाले, हॉस्पीटल काम वेगाने सुरू आहे. सद्य स्थितीत 'कोरोनामुळे 34 बेड व वीस व्हेंटीलेटर असलेला आयसीयु विभाग तातडीने सुरू करण्यात येणार आहे. रात्रंदिवस हे काम सुरूच असून आपण स्वत: या ठिकाणी कामावर लक्ष ठेवून आहेत. येत्या चार दिवसात त्याचे काम पूर्ण होवून बाहयरूग्ण तपासणी व वीस व्हेंटीलेटर असलेले 34 बेडचा "आयसीयु' विभाग सुरू करणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.