Girish Mahajan Ridicules Claim of Shivsena about CM's Popularity
Girish Mahajan Ridicules Claim of Shivsena about CM's Popularity 
मुख्य बातम्या मोबाईल

..त्यात काय, आम्हीही भाजपचे मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये आणू शकतो!

संपत देवगिरे

नाशिक : खाजगी सर्व्हेवर आमचा विश्वास नाही. त्यात काय एव्हढे, आम्ही देखील खाजगी सर्व्हे करुन भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये आणू शकतो, अशी खोचक प्रतिक्रिया माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे, याबाबत त्यांनी हे विधान केले. 

श्री. महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विविध प्रश्‍न विचारण्यात आले. आयएएनएस आणि सी व्होटर्स संस्थेने नुकताच लोकप्रिय मुख्यंत्र्यांबाबत एक सर्व्हे केला.

या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के होती. त्यामुळे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला. त्यात पहिल्या पाचमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही. हे कसे काय? असे विचारले. तेव्हा श्री. महाजन म्हणाले, ''खाजगी संस्थांच्या सर्व्हेवर आमचा विश्‍वास नाही. त्याला फारसे महत्व नाही. आम्ही देखील खाजगी संस्थेकडून सर्व्हे करुन पहिल्या पाचमध्ये भाजपचे मुख्यमंत्र्यांचा समावेष करु शकतो,''

त्यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर टिकाही केली. ते म्हणाले, ''आज करोनाचा संसर्ग वेगाने राज्यात पसरतो आहे. मात्र या सरकारमधील सर्व मंत्री घरातच बसुन आहेत. कोणीही बाहेर पडलेला दिसत नाही. त्यांच्यात समन्वय नाही. नियोजनाचा अभाव आहे. घरात बसून ते इतरांना तुम्ही काय करीत आहात, असे विचारतात. हे म्हणजे, तुम्हीच लढा आणि मरा असे सांगायचे. असे कसे चालेल,'' 

नागरिक व सरकार यांच्यात दलाल नाही

महाजन पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अतिशय प्रभावी काम सुरु आहे. वीस कोटी नागरीकांच्या खात्यात सरकारने प्रत्येकी पाचसे रुपये जमा केले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची सुट दिल्याने कर्मचाऱ्यांनी ६६० कोटी रुपये काढले. आठ कोटी महिलांना तीन गॅस सिलेंडर्स दिले आहेत. श्रमीक एक्‍सप्रेस गाड्या सुरु केल्या. वंदे भारत मोहिमेने विमाने सोडली. हे सर्व थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले," 

''नागरिक व सरकार यांच्यात कोणीही दलाल राहिला नाही. भ्रष्टाचार थांबला. देश आत्मनिर्भरतकडे वाटचाल करीत आहे. लॅकडाऊननंतर केंद्र शासनाने ज्या वेगाने निर्णय घेतले, त्यामुळे कोरोना नियंत्रणात राहिला. आज आपण परदेशात औषधांचा पुरवठा करीत आहोत. अनेक देश आपल्याकडे औषधांची मागणी करीत आहेत. आपण त्याची पुर्तता करीत आहोत,'' असेही महाजन म्हणाले. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT