मुख्य बातम्या मोबाईल

आदिवासींना व्यापारात उतरण्याची संधी द्या !

सरकारनामा ब्युरो

 
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्‌ बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या माध्यमातून कमी अनामत रक्कम घेऊन आदिवासींना देखील शेतमालाच्या व्यापारात उतरण्याची संधी द्यावी. तसेच बाजार आवार उभारण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज व पाणी उपलब्ध झाले तर बाजार समितीत शेतमाल येण्याचे प्रमाण वाढेल. स्थानिक शेतकऱ्यांशी त्याची नाळ जुळेल, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले. 

नाशिक कृषी उत्पन्‌ बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजाराच्या इमारतीचे भुमिपुजन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. बुजबळ यांनी देखील या उपबाजाराचा विकास करतांना आणि तेथील इमारतीत नवे व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात स्थानिक नागिरकांना परवडतील असे दर निश्‍चित करावेत. त्यामुळे स्थानिकांना त्याचा लाभ घेता येईल अशी सुचना त्यांनी यावेळी बाजार समितीच्या संचालक मंडळाला केली. 

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, त्र्यंबकेश्वर तालुकात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून भविष्यात आदिवासी समाजाला रोजगाराची संधी या आवाराच्या माध्यमातुन निर्माण होणार आहे. त्यामुळे पिकविणाऱ्या शेतकऱ्याला विकण्याची संधी कृषी उत्पन्न बाजार समितीने उपलब्ध करुन द्यावी. तसेच या बाजार आवारामुळे या तालुक्‍यातील जवळपासच्या शेतकऱ्यांचा दळण वळणाचा मोठा प्रश्न सुटणार असून स्थानिक पातळीवरच त्यांच्या माल विकला जाईल. लॉकडाऊन काळात सगळे बंद असून देखील शेतीचे कामे अनलॉक होती. त्यामुळे येणाऱ्या काळातील सोशल डिस्टन्सिंगचे महत्व लक्षात घेवून शेतकऱ्यांसाठी अशा छोट्या छोट्या स्वरुपाचे बाजार सुरु होणे आवश्‍यक आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या अनुषंगाने बंदिस्त बाजारा पेक्षा खुली बाजार पध्दती सुरु करावी. मुंबई महामार्गालगत खुल्या मैदानावर शेतकरी विकत असलेला माल विकू देण्याची सूचना पोलिसांना केली. येणाऱ्या काळात टर्मिनल मार्केट तयार करण्यासाठी व पॅकींग पध्दतीकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

कोनशीला अनावरण प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, नाशिक कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, उपसभापती युवराज कोठुळे, नगराध्यक्ष पुरषोत्तम लोहगांवकर, त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराव दिवे, गटविकास अधिकारी मुरकुटे उपस्थित होते. 
... 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=qSHDDWXMMQEAX8ldA3w&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=86eeffc8bb042934c75e2e4961f17b2a&oe=5F8BF227

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT