ngp15.jpg
ngp15.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीचे नेते कोलते यांचा गावातच दारूण पराभव..

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी नेते संभाजी झेंडे यांच्या पॅनलचा त्यांच्या गावात अनुक्रमे पिसर्वे, वाळुंज, दिवे गावात पराभव झाला. लक्ष लागून राहिलेल्या या दिवे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भाजप नेते बाबा जाधवराव यांनी काँग्रेसजनांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या संमिश्र पॅनलचा दारुण पराभव केला. 

नीरा या सर्वाधिक मोठ्या गावात काँग्रेसचे राजेश काकडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा पराभव करीत पॅनलकडे तब्बल 13 जागा जिंकून आणल्या. विरोधी चव्हाण गटाला फक्त चार जागा मिळाल्या. याशिवाय काळदरीचे माजी सरपंच यांची अनेक वर्षांची सत्ता या निवडणुकीत गेली.

 पिसर्वे येथे शिवसेना व काँग्रेस यांचे संयुक्त पॅनल विजयी झाले तर वाळूज येथे रमेश इंगळे यांचे शिवसेनेचे पॅनल विजयी झाले. पारगाव येथे पारंपरिक पारेश्वर पॅनल विजय झाले. पिंपरी येथे विजय झाले. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल द्वारे बहुमत आले आहे. कित्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी आघाडी बहुमतात आली आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस व शिवसेना अशी ही आघाडीही दिसत आहे. थोड्याफार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आणि काही निवडक गावात भाजप-शिवसेना, भाजप-काँग्रेस अशी आघाडी बहुमतात आहे. पक्षीय आघाड्यांप्रमाणे काही गावकी, भावकी, गटांच्या आघाड्याही दिसतात. ते लगेच पक्षीय रंग देणे टाळताना दिसले. 

हेही वाचा : कोथळीत खडसे परिवाराच्या पॅनलचा शिवसेनेवर विजय
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कोथळी ग्रामपंचायत निवडणूकीत ‘खडसे’परिवाराच्या पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ‘कोथळी’ग्रामपंचायत निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. एकनाथराव खडसे व त्यांच्या कन्या रोहीणी खडसे  यांनी  भारतीय जनता पक्षातून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’मध्ये प्रवेश केला, मात्र खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे भारतीय जनता पक्षात आहेत. यावेळी खडसे प्रणित भाजप पॅनल न करता खडसे परिवारात माननाऱ्या उमेदवारांचे पॅनल करण्यात आले होते. त्या विरूध्द शिवसेनेचे जिल्हा प्रमूख व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे परिवर्तन पॅनल उभे होते. त्यात मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT