Grape Farmers Approach CM for Help
Grape Farmers Approach CM for Help 
मुख्य बातम्या मोबाईल

द्राक्ष उत्पादक म्हणतात....मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा'

सरकारनामा ब्युरो

नाशिक : द्राक्ष काढणीच्या हंगाम सुरु होताच देशात संचारबंदी लागू झाली. संचारबंदी सुरू होण्यापूर्वी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातक्षम द्राक्षाची निर्यातदारांमार्फत विक्री केली. परंतु अद्यापपर्यंत त्या निर्यातदारांनी संबंधित शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. ही फसवणूक करणाऱ्या निफाडच्या मेसर्स सारथी या निर्यातदार संस्थेवर कारवाई करावी. शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी, द्राक्षउत्पादकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निफाड तालुका अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ते म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असतानाही नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख तेरा हजार टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. यंदाच्या हंगामात निफाड तालुक्‍यातून सुमारे एकाहत्तर हजार टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुरुवातीला चांगल्या बाजार भाव मिळाल्याने द्राक्षाची विक्री केली. मात्र या निर्यातदारांनी अद्याप शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्यांना पुढील हंगामाची पिके घेण्यासाठी भांडवल उपलब्ध नाही. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी निर्यात केलेल्या द्राक्षाचे पैसे दोन महिन्याने मिळतात. यंदा ते पैसे मिळालेले नाहीत. या स्वरुपाच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.''

''द्राक्षबागा खाली झाल्यानंतर शेतकऱ्यांना खिशात पैसे येत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करुन उत्पादन घेतले. त्यात लॉकडाऊनमुळे सुरुवातीला खाली झालेल्या बागांना चांगले पैसे मिळाले. परंतु त्यानंतर शिल्लक राहिलेल्या बऱ्याच द्राक्षबागांना व्यापारी व ग्राहक नसल्याने आपले द्राक्ष बेदाणा व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने द्यावी लागली. काहीं शेतकऱ्यांनी स्वतःच बेदाणे केले. नैताळे (निफाड) येथील सारथी निर्यात संस्थेने अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्याकडून घेतलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचे पैसे दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाईकरुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,''असेही ते म्हणाले


.... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT