Bacchu Kadu
Bacchu Kadu 
मुख्य बातम्या मोबाईल

 पालकमंत्री आले.. अन्  शासकीय रुग्णालयातील जेवण सुधारले...

सरकारनामा ब्युरो

पुणे :अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी पालकमंत्री बच्चू कडू हे सर्वच विभागाचा युद्धपातळीवर आढावा घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगले जेवण मिळत नसल्याची बाब पुढे आली होती. वार्डात वेळेवर सकाळचा चहा पोहोचत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता.  हा विषय  पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर जाताच त्यांनी  सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर रुग्णांकडूंन प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेऊन जेवणाची तपासणी केली. दरम्यान त्यांनी भोजनाचा दर्जा सुधारण्याच्या  सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यांच्या या सूचनेचे तत्काळ अंमलबजावणी करीत प्रशासनाने रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारला आहे.  

त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तपासला.  कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवली तरच कोरोनाला हरवले जाऊ शकते, असे तज्ज्ञांच्या निष्कर्षातून पुढे आले आहे.  ही बाब लक्षात घेता रुग्णांना सकस आहार मिळणे गरजेचे असल्याची बाब पालकमंत्र्यांनी जीएमसी प्रशासनाला लक्षात आणून देत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तत्काळ सुधारण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना दिले होते. त्यानंतर प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या या आदेशाची दखल घेतल्याने भोजनाचा दर्जा उंचावल्याचे पहायला मिळाले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष दिल्याने जेवणाचा दर्जा सुधारल्याने रुग्णात समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा  :  लोणार सरोवरातील पाण्याचा रंग का बदलला ?  

पुणे : निर्सगाचा अनमोल ठेवा धोक्यात आला आहे का, अशी चिंता आता वाटू लागली आहे. कारण जगप्रसिद्ध असलेल्या  बुलढाणाच्या लोणार सरोवरांच्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर तेथे गेलेल्या पर्यटकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. लोणार सरोवरात एक आश्चर्यकारण बदल घडला आहे. सरोवरातील पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी पाहिले,  हा निर्सगाचा चमत्कार की आणखी काही वैज्ञानिक संकटाची नांदी आहे, याबाबत सध्या चर्चा आहे.

या सरोवरातील पाणी गुलाबी, लाल का झाले याबाबत उत्सुकता आहे. पण सरोवराचे पाणी गुलाबी होणं हि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे, लोणारचे अभ्यासक आंनद मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. सरोवराच्या आजूबाजूला उभ्या राहिलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे मोठ्या 'बोर' घेतल्या.  त्यामुळे पाण्याचे स्रोत कमी झाल्याचे बोलले जात होते, पण, अशी स्थिती इथे नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT