Uddhav Thackeray & Gulabrao Patil (17).jpg
Uddhav Thackeray & Gulabrao Patil (17).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

उद्धवजी तिकडे चला म्हटले तर आम्ही तिकडे जाणार : गुलाबराव पाटील

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : राज्याच्या मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत चांगले वातावरण आहे, कुठेही अडचण येत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठका घेऊन चांगले काम करीत आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेना, भाजप युतीबाबत त्यांच्या बोलण्याचा कुणी काय अर्थ लावतो मला माहित नाही, मात्र आमचे नेते जो निर्णय घेतील, त्या सोबत राहणारे आम्ही शिवसैनिक आहोत. असे मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे एका भाषणात आगामी काळात शिवसेना, भाजप भविष्यात एकत्र येण्याचे संकेत दिले, त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता,ते म्हणाले, आमचे नेते उध्दव ठाकरे जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असतो,आता त्यांनी हे वक्तव्य केले ते कोणत्या आधारावर केले याची आपल्याला माहिती नाही. मात्र, नेत्यांनी आदेश द्यावा आणि कार्यकर्त्याने मानावा असे आम्ही लोक आहोत.

उदया त्यांनी आदेश द्यावा, तिकडे चला, आम्ही त्यानुसार तिकडे जाणारे लोक आहोत.ठाकरे यांच्या निर्णयावर मी माझे मत नाही मांडू शकत, त्यांच्या मनात काय आहे, हे आम्ही कसे सांगणार. एक मात्र खरे की ते आमचे नेते आहेत, त्यांनी आदेश द्यायचा आणि आम्ही मानायचा एवढेच आम्हाला माहीत आहे.

शिवसेना,भाजप युतीबाबत मला तरी सांगता येणार नाही, कारण मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत चांगले वातावरण आहे, कुठेही कोणतीही अडचण आली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेवून जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. चांगले काम करीत आहेत.त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या बोलण्याचा कुणी काय अर्थ लावतो हे मला माहीत नाही. मात्र, मी पुन्हा सांगतो ते जो निर्णय घेतील त्या सोबत आम्ही जाणार असल्याचे पाटील म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT