Pankaja Munde, Pritam Munde .jpg
Pankaja Munde, Pritam Munde .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

प्रीतम मुंडेंच्या पंकजांना अनोख्या शुभेच्छा, म्हणाल्या...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आज (ता. २६ जुलै) भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, सगळ्यात वेगळ्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यांची लहान बहीण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे  (MP Pritam Munde) यांनी. त्यांनी फक्त शुभेच्छाच नाही, तर त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक फोटोही शेअर केला आहे. (Happy Birthday to Pankaja Munde from MP Pritam Munde) 

प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या ट्वीटवरुन हा फोटो शेअर केला आहे. यात पंकजा आणि प्रीतम यांचा लहानपणीचा फोटो आणि त्यांचे आत्ताचे काही फोटो असे कोलाज आहे.

हा फोटो ट्विटरवर शेअर करत प्रीतम मुंडे म्हणाल्या, ''पाच वर्षांची असशील. तेव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही सांभाळत आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटते, त्या आभाळाएवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!''

पंकजा आणि प्रीतम यांच्या लहानपणीच्या या फोटोमध्ये पंकजा या फोनवर बोलताना दिसत आहेत. प्रीतम या त्यांच्या शेजारी बसल्या आहेत. तर इतर दोन फोटोंमध्ये प्रीतम आणि पंकजा एकाच व्यासपीठावर बसलेल्या असल्याचे दिसत आहे. त्या दोघींमध्ये संवाद चालू आहे, असेही दिसत आहे.  

हेही वाचा...

भाजपच्या राष्ट्रीय सचिव व मध्यप्रदेश भाजपच्या सहप्रभारी पंकजा मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जेष्ठ कन्या आहेत. भाजपमधील मास लिडर अशी त्यांची ओळख आहे. सुरुवातीला जलसंधारण व महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी प्रथम लोकसभा निवडणुक लढवल्यानंतर २००९ मध्ये परळी विधानसभेची निवडणुक पंकजा मुंडे यांनी लढविली. त्या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. 

त्यानंतर त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले. २०१४ मध्ये त्यांनी राज्यात 'पुन्हा संघर्ष यात्रे'च्या माध्यमातून ७९ मतदार संघातून पदयात्रा काढली. या निवडणुकीनंतर महायुती सरकारमध्ये त्यांनी महिला व बालविकास, ग्रामविकास, जलसंधारण, रोहयो अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम केले. जलसंधारण खात्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT