Heavy rain in Dapoli .jpg
Heavy rain in Dapoli .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

दापोलीत मुसळधार पाऊस, चिपळूणला सतर्कतेचा इशारा 

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी (ता. ५) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  चिपळूण (Chiplun), दापोलीला (Dapoli) पावसाने झोडपले आहे. तसेच जगबुडी, वाशिष्टी नदीत पाणी वाढल्याने परत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. (Heavy rain in Dapoli) 

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

नदीला पुर असताना नागरिकांनी धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये. वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या ३-३ रांगा करू नयेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. 

घराभोवती विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे. पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. औषधे, केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

दरम्यान, काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अलिबाग मुरुड मार्गावर कोर्लई गावाजवळ दरड कोसळली आहे. ही घटना रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती आहे. दरड कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरड कोसळण्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मुसळधार पावसाने अडथळे येत होते. पहाटे पाऊस थांबताच रस्त्यावर पडलेला मातीचा ढिगारा बाजूला केला असून वाहतूक पूर्वरत सूरु केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT