vinod tawade rally in delhi
vinod tawade rally in delhi 
मुख्य बातम्या मोबाईल

विनोद तावडेंच्या सभांना दिल्लीत `प्रचंड` प्रतिसाद

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे दिल्लीतील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांच्या सभांना `प्रचंड` प्रतिसाद मिळत असल्याची छायाचित्रे सोशल मिडियात शेअर केली जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दिल्लीत आप आणि भाजप यांच्यात निकराचा सामना होत आहे. भाजपने आपले विविध राज्यांतील नेते दिल्लीत प्रचारासाठी उतरवले आहेत. दिल्लीचा कोपरा न कोपरा हे नेते फिरत आहेत. त्यातच विनोद तावडे यांनीही या प्रचारात आपल्या परीने रंग भरले आहेत. त्यांना दिल्लीतील शाळा दाखवा आणि त्यांना छोले-भटूरे खाऊ घाला, असाही सल्ला केजरीवाल यांनी दिला आहे. 

विनोद तावडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते. मात्र, २०१९मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आलं नव्हतं. यावरून त्यांना पक्षाकडून डावलण्यात आल्याचं बोललं जात होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT