ajit pawar not in favor of hyper pool
ajit pawar not in favor of hyper pool 
मुख्य बातम्या मोबाईल

फडणविसांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर अजितदादांची कात्री!

अनिल सावळे

पुणे : हायपर लूप प्रकल्प जगात कोठेही झालेला नाही. आधी जगात इतरत्र कुठे तरी होऊ द्या, किमान दहा किलोमीटर तरी होऊ द्या. तो यशस्वी झाल्यावर मग आपण त्याचा विचार करू, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हायपर लूप प्रकल्प होणार नसल्याचे संकेत दिले.

पवार म्हणाले, हायपर लूप प्रकल्प जगात अद्याप कोठेही झालेले नाही त्यामुळे तसेच या प्रकल्पाची ट्रायल घेण्याची आपली क्षमता नाही. पुणे- मुंबईकरांची गरज असल्यास त्याबाबत विचार करण्यात येईल. पुणे-मुंबई दरम्यान घाटात वाहतूक सुरळीत करण्यासाठी बोगदा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू झाल्यास पुणे-मुंबई वाहतूक आणखी सुरळीत होईल.

पीएमआरडीए अंतर्गत मेट्रो हडपसरऐवजी कदमवाकवस्ती पर्यंत तसेच स्वारगेट ते हडपसर मेट्रो मार्ग सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत अहवाल तयार करून कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आज मेट्रो प्रकल्प, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, एचसीएमटीआर मार्ग आदी विषयांवर आढावा घेतला. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पवार म्हणाले, स्वारगेट ते हडपसर मेट्रो होणे गरजेचे आहे. स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भूमिका राहणार असून, पिंपरी ते निगडी हा रेल्वे मार्ग एलिव्हेटेड असेल. कात्रज भागात कात्रज भागात नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे मेट्रो कात्रजपर्यंत नेण्याची आमची तयारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT