Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal 
मुख्य बातम्या मोबाईल

मलाही नुसत्या आरोपामुळे द्यावा लागला होता राजीनामा !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कुणावर आरोप झाले म्हणजे लगेच दोषी मानणे गैर आहे. अब्दुल करीम तेलगीच्या गैरव्यवहार प्रकरणात मलाही नुसत्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला होता. याची आठवण करुन देत, नंतर ते दोषी असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकला कोरोना आढावा बैठकीनंतर ते सचिन वाजे प्रकरणावर बोलत होते. श्री भुजबळ म्हणाले की, निलंबित सचीन वाजे यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला धक्का बिक्का काही नाही. सचिन वाजेच काय यात चौकशीत दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल..त्यांच्यावर कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांनी तसे स्पष्ट केले आहे. मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन पोलिस आधिकाऱ्यांवर आरोप झाले. त्यांच्यावर कारवाई झाली. मात्र जेव्हा हा प्रकार सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा मात्र ते आधिकारी निर्दोष ठरले याची आठवण करुन देत, मला राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळेच नुसते आरोप झाले म्हणजे कुणाला दोषी मानने गैर आहे. सचीन वाजे प्रकरणात चौकशी होईल. त्यात, काय सत्य काय असत्य ते बाहेर येईल. त्यामुळे याविषयी बोलणे योग्य नाही. असेही स्पष्ट केले.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT